---Advertisement---

भयानक : माल गाडीने घेतला अचानक पेट

By team
On: February 6, 2024 1:11 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरातून नेहमीच अपघाताच्या घटना समोर येत असताना नुकतेच रायगडमधून आगीची मोठी घटना समोर आली आहे. चौक रोड येथे एका माल गाडीने अचानक पेट घेतला आहे. पनवेल खालापूर दरम्यान चौक रोड रेल्वे स्थानका दरम्यान ही घटना घडलीये. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.

घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सदर मालवाहू गाडीतून कच्च्या तेलाची वाहतूक सुरू होती. आतमध्ये कच्चे तेल असल्याने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता आलं नाही तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.

मात्र बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांना आग विझवण्यात यश आलं आहे. आग दुर्घटने दरम्यान रेल्वेची ओव्हर हेड वायर तुटली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मालवाहू गाडीतून कच्च्या तेलाची वाहतूक मुंबईहून मिरजला करण्यात येत होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!