---Advertisement---

प्रेयसीसोबत लिव्ह इन तर दुसरीशी लग्न : सोलापुरातील प्रेयसीची तक्रार

By team
On: February 10, 2024 9:51 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यातील अनेक घटना प्रेम प्रकरणातून घडत आहे. अशीच एक घटना सोलापुरात असलेल्या तरुणीसोबत पुण्यात घडली आहे. एकाच कॉलेजमध्ये, एका वर्गात शिकल्याने ओळख झाली. पुढे प्रेमात रूपांतर झाले. लग्न करण्याचे ठरवून लिव्ह इनमध्ये राहू लागले अन् गुपचूप प्रियकरानं दुसरं लग्न केलं. तो ते लग्न लपवून तिच्याशी अतिप्रसंग करीत राहिला. दहा वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. सोशल मीडियावरून त्याचं लग्न झाल्याचं समजल्यानंतर फसवणूक केल्याची तक्रार सोलापुरातील पण सध्या पुण्यात नोकरी करणाऱ्या तरुणीने केली. फौजदार चावडी पोलिसात याप्रकरणी फिर्याद देण्यात आली आहे.

मुलगा पीडितेस लग्नाचे आमिष दाखवत होता. दरम्यान, त्याच्या मोबाइलवर एका महिलेच्या नावाने फोन येत होता. मुलीस संशय आल्याने तिने संबंधित महिलेचे नाव सोशल मीडियावर शोधले. तिला मुलाचा व त्याच्या पत्नीचा फोटो दिसून आला. याप्रकरणी अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ईश्वर दत्तात्रय पिंगळे असे या तरुणाचे नाव आहे. फिर्यादी व आरोपी दोघे सोलापूर शहरातीलच आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!