---Advertisement---

मोठी बातमी : शिंदे गटाच्या खासदाराचा दिल्लीत अपघात

By team
On: February 19, 2024 2:43 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशभरात अपघाताची मालिका सुरु असतांना आता राज्यातील शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा राजधानी दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात हेमंत गोडसे यांना गंभीर दुखापत झाली नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे आज राजधानी दिल्लीमध्ये आहेत. नवी दिल्लीमधील संसदेतील शिव जयंती उत्सव आटोपून हेंमत गोडसे हे आपल्या इनोव्हा कारमधून (क्र. MH 15 FC 9909) निवास्थानी जात होते. यावेळी दिल्लीतील बी डी मार्गावर त्यांच्या गाडीला एका भरधाव ईर्टिगा कारने (DL 7CW 2202) जोरदार ध़डक दिली. या अपघातात खासदार हेमंत गोडसे हे सुखरुप आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र त्यांच्या इर्टिगा कारचे मोठे नुकसान झाले आहे.

ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. याचनिमित्ताने राजधानी दिल्लीमध्येही काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमांसाठी हेमंत गोडसे हे दिल्लीमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!