---Advertisement---

ट्रॅक्टरच्या डीलरशिपची ऑफर : १६ लाखात फसविले

By team
On: March 13, 2024 9:40 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

ट्रॅक्टरची डीलरशिप ऑफर आहे, असे सांगून ती डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका तरुणास ऑनलाइन १६ लाख ३० हजार रुपये घेऊन फसविल्याची घटना सोलापूर शहरातील दमाणी नगर, सदर बझार आणि इतर ठिकाणी वेळोवेळी घडली. याप्रकरणी सोलापूरच्या एका आरोपीसह ‘धाराशिव’च्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या अटकेसाठी शहर पोलीस पथक ‘धाराशिव’ कडे रवाना झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यात फसलेल्या तरुणाचे नाव योगेश बाबू दिवेकर (वय ३३, रा. उत्कर्ष नगर, विजापूर रोड, सोलापूर) असे आहे. ऋषिकेश पटवारी (रा. दमाणी नगर, सोलापूर), नितीन जाधव आणि प्रवीण बाळासाहेब करळे (दोघेही रा. परांडा,जि.धाराशिव) अशी आरोपींची नावे आहेत १० मार्च २०२२ पासून आजतागायत वेळोवेळी त्या तरुणाची ऑनलाईनद्वारे आरोपींनी फसवणूक केली आहे.

फिर्यादी योगेश दिवेकर याच्या ओळखीचे संजय राजन यांनी त्यास ट्रॅक्टरची डीलरशिप आहे, असे सांगून बोलावून घेतले. त्यांचा मित्र आरोपी ऋषिकेश पटवारी हा इंटरनॅशनल ट्रॅक्टर्सचा एरिया मॅनेजर असून त्याने फिर्यादीस स्वराज ट्रॅक्टरचे डीलरशिपची ऑफर दिली. तेव्हा फिर्यादीने त्यास डिपॉझिटपोटी १० मार्च २०२२ रोजी ३ लाख रुपये दिले होते. यानंतर आरोपी ऋषिकेश पटवारी याने आरोपी नितीन जाधव, प्रवीण करळे यांचे विठ्ठल ट्रॅक्टर्सचे मालक यांच्याकडून सबडीलर म्हणून ट्रॅक्टर खरेदी-विक्री करण्यासाठी १३ लाख ३० हजार रुपये घेऊन दिले. मात्र फिर्यादीकडून ट्रॅक्टर खरेदी विक्री करण्यासाठीची डीलरशिप काढून घेऊन त्यापोटी फिर्यादी कडून घेतलेली रक्कम आजतागायत परत न करता टाळाटाळ करून त्याचा विश्वासघात केला. याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!