---Advertisement---

सुप्रसिद्ध गायिका पौडवालांनी हाती घेतला भाजपचा झेंडा

By team
On: March 17, 2024 10:42 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून सत्ताधारी भाजप पक्षात अनेक नेत्यासह पदाधिकारी पक्षात प्रवेश करीत असतांना सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी देखील भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. आज भाजपात प्रवेश करुन आपल्याला आनंद झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच भाजपात प्रवेश करताना त्यांनी जय श्रीरामचा नाराही दिला आहे. अनुराधा पौडवाल या हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतल्या प्रसिद्ध गायिका आहेत. तसंच त्यांनी अनेक भक्तिगीतंही गायली आहेत.

“जय श्रीराम! मी आज भाजपाची सदस्य झाली आहे. मला आज खूप आनंद झाला आहे. कारण मी आज त्या सरकारशी जोडली गेले आहे ज्या सरकारचं नातं सनातन धर्माशी आहे. मागच्या ३५ वर्षांहून अधिक काळ मी भक्तिगीतं गातं आहे. सुरुवातीला मी सिनेसृष्टीतही गायले, त्यानंतर मी भक्तिगीतंच म्हणते आहे. मला अनेकदा वाटायचं की मी घेतलेला हा निर्णय योग्य की अयोग्य. मात्र समाधान या गोष्टीचं आहे की रामलल्लाची स्थापना झाली तेव्हा मला तिथे पाच मिनिटांसाठी गाणं म्हणता आलं. त्यामुळे माझा निर्णय योग्यच होता.”

“गंगा नदीची आरती माझ्याच आवाजातली आहे जी सकाळ-संध्याकाळ होते. या सगळ्या भक्ति गीतांवर कळस चढवण्याचं काम रामलल्लासमोर म्हटलेल्या भजनामुळे झालं. मला त्यावेळी खूप समाधानी वाटलं कारण माझं स्वप्न पूर्ण झालं. मी भाजपात आले हे माझं भाग्य आहे तुम्हा सगळ्यांचे आभार असं अनुराधा पौडवाल यांनी म्हटलं आहे.”

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!