---Advertisement---

कोरोना लसीचा डोस घेतलेले हरियाणाचे आरोग्यमंत्रीच झाले पॉझिटिव्ह

On: December 5, 2020 4:37 PM
Follow Us:
---Advertisement---

चंदीगढ । स्वदेशी कंपनी ‘भारत बायोटेक’च्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यावरील चाचणीत स्वयंसेवक झालेले हरियाणाचे आरोग्य तथा गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. विज यांनी शनिवारी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. तसेच, त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही तातडीने कोविडची चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. विज हे 20 नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’च्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये सहभागी होणारे पहिले स्वयंसेवक होते. लस घेऊनही विज यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर, आता कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

भारत बायोटेकचे स्पष्टीकरण

लस घेऊनही विज यांना कोरोनाची लागण झाल्यावर कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यासंदर्भात भारत बायोटेकने एक निवेदन जारी केले आहे. यात, कोव्हॅक्सिनच्या 2 ट्रायलचे शेड्यूल आहे. दोन डोस 28 दिवसांत द्यायचे आहेत. दुसरा डोस 14 दिवसांनंतर द्यायचा आहे. यानंतरच याची एफिकेसी समजेल. दोन डोस दिल्यानंतरच ही लस (कोव्हॅक्सिन) प्रभाव दाखवेल, अशा पद्धतीनेच तिची निर्मिती करण्यात आली आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!