---Advertisement---

लोकनेते ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या पुरस्कारांची घोषणा

By team
On: March 31, 2024 9:28 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान कुरनूरच्या वतीने लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या २५ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त राज्यस्तरीय ,जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून दि.५ एप्रिल रोजी अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे सायंकाळी ६.३० वाजता पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते बाळासाहेब मोरे व कार्याध्यक्ष विनोद मोरे यांनी दिली.

याप्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता विभाग विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांचा डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस आरोग्य दूत महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान होणार आहे. तसेच दोडयाळ येथील प्रगतशील शेतकरी शिवलिंगाप्पा चौलगी ( यशवंतराव चव्हाण आदर्श शेतकरी ) श्रीमती शकुंतला जाधव, सोलापूर (राष्ट्रमाता जिजाऊ महिला सेवा ) शतकवीर रक्तदाते अभिजीत लोके (महात्मा बसवेश्वर शतकवीर रक्तदाता व आदर्श शिक्षक ), शिवशरण जवळगे ( स्व.आमदार बाबासाहेब तानवडे सिंचनसमृद्धी ) , पत्रकार स्वामीराव गायकवाड ( सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले लोकाभिमुख पत्रकार ) सामाजिक कार्यकर्ते रशीद खिस्तके ( राष्ट्रसंत तुकाराम महाराज समाजसेवा ) या पुरस्काराने सर्व मान्यवराचां गौरव होणार आहे. सदरच्या पुरस्कारांचे वितरण छत्रपती संभाजीनगर येथील जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल कुशिरे यांच्या हस्ते तसेच राजेराय मठाचे अध्यक्ष एड. शरद फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली व विविध मान्यवराच्यां उपस्थितीमध्ये एका विशेष समारंभात होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोरे यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!