---Advertisement---

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ५ दहशतवाद्यांना पकडले

On: December 7, 2020 11:17 AM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ५ दहशतवाद्यांना अटक केली असून यांपैकी २ पंजाब, तर ३ काश्मीरमधील असल्याचे पोलिस उपायुक्त प्रमोद कुशवाहा यांनी माहिती देताना सांगितले. या दहशतवाद्यांकडून हत्यारे आणि इतरही आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आली आहे.

हे सर्व दहशवादी इस्लामिक आणि खलिस्तानी संघटनांशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी दीर्घकालीन मोहीम राबवली होती. थोड्याच वेळात पत्रकार परिषद आयोजित करून पोलिस या कारवाईबाबत माहिती देणार आहेत.

दिल्लीतील शकरपूर परिसरात पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाल्यानंतर ५ दहशतवाद्यांना पकडण्यात आले. दिल्लीच्या विशेष पथकाचे पोलिस उपायुक्त प्रमोद कुशवाहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ५ दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवादी पंजाबचे, तर उर्वरित ३ काश्मीरचे आहेत. या दहशतवाद्यांकडून हत्यारे आणि आक्षेपार्ह सामान हस्तगत करण्यात आले आहे. पकडले गेलेल्या दहशतवाद्यांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे स्पष्ट होत असल्याचे कुशवाहा म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!