---Advertisement---

पवारांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचे षडयंत्र भाजपचे ; सुळे

By team
On: April 6, 2024 4:03 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

बारामती लोकसभा जिंकण्यासाठी भाजपचे नेते एकवटले आहेत. आम्ही मात्र सत्याच्या मार्गाने बारामती लोकसभा जिंकू, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. सुप्रिया सुळे या हिंजवडीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी थेट भाजपवर देखील टीकास्त्र सोडले आहे.

सुळे म्हणाल्या कि, शरद पवार यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचे षडयंत्र भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ”महाराष्ट्राचे लढवय्ये नेते शरद पवार यांना राजकीय दृष्ट्या संपवायचे हे भाजप नेत्यांच्या तोंडून महाराष्ट्रासह अवघ्या देशांने ऐकले आहे. बारामतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना संपवायचे, अशी भाषा वापरली, हे भाजपच्या पोटातील ओठावर आले आहे. हे भाजप नेत्यांचे आणि चंद्रकांत पाटील यांचे षडयंत्र आहे”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

यावेळी सुप्रिया पुढे म्हणाल्या, भाजपचे केवळ एकच स्वप्न आहे, ते म्हणजे शरद पवार यांना राजकीय दृष्ट्या संपवणे. भाजप पक्षाला वैचारिक विरोधक संपवायचा आहे. त्यामुळे ते लोकशाहीकडून दडपशाहीकडे हा देश घेऊन जात आहेत. आम्ही सत्याच्या मार्गाने बारामती लोकसभा जिंकू” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!