---Advertisement---

मोहिते-पाटलांमुळे राज्यात महाविकास आघाडी भक्कम : खा. शरद पवार

By team
On: April 15, 2024 9:09 AM
Follow Us:
---Advertisement---

अकलूज : वृत्तसंस्था

देशातील मोदीप्रणित हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी इंडिया आघाडी प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नाला आता आमच्यापासून दुरावलेले विजयसिंह मोहिते-पाटीलही सहभागी झाले आहेत. त्यामुळे राज्यात आता महाविकास आघाडी भक्कम झाली असून, या आघाडीच्या माध्यमातून देशाला हुकूमशाहीकडे नेऊ पाहणाऱ्या भाजपला चारीमुंड्या चित करू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केला.

खासदार शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शेकापचे आ. जयंत पाटील हे रविवारी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर स्नेहभोजनाच्या निमित्ताने आले होते. त्यांनी माढा लोकसभेसंदर्भात मोहिते-पाटील परिवाराशी चर्चा केली. त्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

या भेटीत खा. शरद पवार व उपस्थित नेत्यांनी सुमारे दीड तास मोहिते-पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर राजकीय चर्चा केली. बंद खोलीत विजयसिंह मोहिते- पाटील, जयसिंह मोहिते-पाटील, मदनसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते-पाटील, संग्राम सिंह, अर्जुन सिंह, शिवतेज सिंह यांच्यासह सर्व मोहिते-पाटील परिवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, शेकापचे आ. जयंत पाटील यांनी सुमारे दीड तास चर्चा केली. यावेळी नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप समजू शकले नाही.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!