सोलापूर : वृत्तसंस्था
देशातील अनेक भागात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून सर्वच पक्षाचे उमेदवार आता भर उन्हात मतदारांच्या भेटी गाठी सुरु केल्या असून सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्याचे नेते धर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी शरद चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी आपल्या भाषणात त्यांनी आमदार राम सातपुते यांच्यावर जोरदार टीका केली “एका रात्रीत विजय दादांच्या सांगण्यावरून याला आमदार बनवलं आता, बीडला याचं पार्सल पाठवण्याचे सुद्धा धमक आमच्यात आहे”
Watch Our Latest Video
दरम्यान सोमवारी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना माध्यमाने मोहिते पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी माझ्या आई वडिलांनी सोलापूर जिल्ह्यात रक्त सांडले आहे, अनेक वर्ष इथला ऊस तोडला आहे, त्यामुळे मी सोलापूरचाच आहे आणि माझं पार्सल हे बीडला नाही तर सोलापूरकर दिल्लीला खासदार म्हणून पाठवतील ही धमक सोलापूरकरांमध्ये असल्याचे उत्तर त्यांनी दिले.









