---Advertisement---

मतदान केंद्रावर सुविधा पुरवा ; नाना पटोले

By team
On: April 21, 2024 9:05 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतांची टक्केवारी समाधानकारक दिसत नाही. जनतेमध्ये मतदान करण्याचा उत्साह आहे; परंतु राज्यात सर्वत्र ४० अंशांपेक्षा जास्त तापमान असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे आरोग्याच्या दृष्टीनेही त्रासदायक ठरत आहे. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर होत आहे. त्यामुळे राज्यातील मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांच्या आवारात सावलीसाठी तात्पुरती शेड बांधावी तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

पटोले यांनी शनिवारी यासंदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र पाठवले. या पत्रात पटोले यांनी म्हटले की, राज्यात ४० अंशांच्या वर उन्हाचा पारा असल्याने या कडक उन्हात मतदान करणे नागरिकांना त्रासदायक होत आहे.. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना या उन्हाचा जास्त त्रास होतो. कडक उन्हामुळे उष्माघातासारखा जीवघेणा प्रकार ओढवू शकतो. मतदानासाठी तासन्तास रांगा लावाव्या लागतात, कडक उन्हात मतदानासाठी रांगा लावणे हे सुद्धा त्रासदायक आहे. नागरिकांचा या कडक उन्हापासून बचाव व्हावा यासाठी निवडणूक आयोगाने सुविधा पुरवल्या पाहिजेत. उन्हापासून बचाव करण्याची सोय उपलब्ध झाली तर मतदानाची टक्केवारीही वाढण्यास मदत होईल, असेही पटोले यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!