---Advertisement---

सोलापुरात राहुल गांधी यांची २४ रोजी सभा : माजी गृहमंत्र्यांनी केली पाहणी

By team
On: April 22, 2024 2:28 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर लोकसभा निवडणूक काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचा प्रचाराचा झंझावात सुरू असून सोलापूरची लेक म्हणून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी सोलापूर शहरातील मरीआई चौकातील एक्झिब्युशन ग्राउंड येथे दुपारी 3 वाजता होणार आहे.

Watch Our Latest Video

या भव्य जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू झाली असून आज रोजी स्टेजचे पूजन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे चेतनभाऊ नरोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, प्रवक्ते अशोक निंबर्गी, सुशील बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, राज सलगर, आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!