ध्यास विश्वसार्ह बातमीचा

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी उत्सवानिमित्त राजेराय मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

येथील श्री स्वामी समर्थांच्याच्या इच्छने स्थापन झालेल्या व परम पूज्य सद्गुरू बेलानाथ बाबांच्या वास्तव्याने पावन झालेल्या राजेराय मठात श्री स्वामी समर्थाचा १४६ वा पुण्योत्सव बुधवार दि. २४ एप्रिल ते ७ मे २०२४ दरम्यान अखंड नाम वीणा सप्ताह, धर्मसंकिर्तन पारायण इत्यादि उपक्रमानी साजरा होत आहे.

दररोज पहाटे ५.१५ वा काकडा आरती, सकाळी ६ ला . श्रींना अभिषेक व पूजा ९ वा. सौ. ज्योती झिपरे यांचे मार्गदर्शना खाली श्री गुरुलीलामृत ग्रंथाचे पारायण , दु १२ वा आरती व प्रसाद , सायंकाळी ५ ते ७ दरम्यान भक्तीसंगीत व शेजारती इत्यादी दैनदिन उपक्रम आहेत. भक्तीसंगीतात दि. २४ एप्रिल रोजी गुरुमाई महिला भजनी मंडळ , दि.२५ रोजी सरस्वती महिला भजनी मंडळ सोलापूर . दि.२६ रोजी बाबुराव सातारकर भजनी मंडळ सोलापूर. दि २७ रोजी कृष्णाई भजनी मंडळ, सोलापूर . दि. २८ रोजी स्वरगंधा भजनी मंडळ, बेळगाव दि. २९ रोजी सरस्वती महिला भजनी मंडळ, अक्कलकोट . दि.३० एप्रिल रोजी सरगम अकॅडमी, अंबरनाथ मुंबई, दि. १ मे रोजी सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट. दि.२ मे रोजी ओम बेला समर्थ भजनी मंडळ, अक्कलकोट. दि. ३ मे रोजी श्री विठठ्ल मंदिर महिला भजनी मंडळ व स्वकुळसाळी समाज भजनी मंडळ, अक्कलकोट. दि. ४ मे रोजी श्री महिला भजनी मंडळ सोलापूर, व दि.५ मे रोजी रामकृष्णहरी महिला भजनी मंडळ व श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ समर्थ नगर, अक्कलकोट यांचे कार्यक्रम होणार आहेत . सोमवार दि.६ मे रोजी मुख्य पुण्यतिथीउत्सव दिवशी दैनदिन पूजेसोबत सकाळी १० वाजता, श्रींच्या चैतन्य पादुकावर सामुदायिक अभिषक. दुपारी १२ वा . नैवेद्य व आरती व नंतर महाप्रसादास सुरवात होईल. सायंकाळी ५ वा. श्रीचा पालखी सोहळा गावातील मुख्य मार्गावरून निघून श्री समाधी मठ व वटवृक्ष देवस्थान येथे भेठ देऊन मठात परत येईल या वेळी पालखी सोबत बॅंन्ड दिंडी घोडे, कोल्हापूर येथील श्रींचा जिवंत देखावा इत्यादी असणार आहेत. मंगळवार दि. ७ मे रोजी सायंकाळी ५ वाजता गोपाल काल्याने उत्सवाची सांगता होईल, तरी सर्व भक्तांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे.असे आवाहन राजेराय मठाचे अध्यक्ष ॲड शरद फुटाणे. उपाध्यक्ष विकास दोडके , सचिव प्रा. किसन झिपरे, विश्वस्त ॲड अनिल मंगरूळे, दत्तात्रय मोरे. डी.एस जयदेव, भुवनेश वर्दे. बिल्वराज नाबर ,विजयकुमार गाजूल, राजकुमार रामन व सल्लागार . सी .एस . हिंडोळे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!