---Advertisement---

हुकूमशाहीच्या व्हायरसला गाढून टाका : उद्धव ठाकरे

By team
On: May 2, 2024 11:00 AM
Follow Us:
---Advertisement---

ईचलकरंजी : वृत्तसंस्था

जे शेतकर्‍यांना दिल्लीत येऊ देत नाहीत त्यांना दिल्लीत येऊ द्यायचं नाही, असा निर्धार करण्याचे आवाहन मी आपल्या सर्वांना करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हे मानायला तयार नाही. दलित व्यक्तीने लिहिलेलं संविधान मी कसं मानू हा आकस त्यांना आहे त्यामुळे हुकूमशाही चालवणार्‍या व्हायरला गाठून टाका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. इचलकरंजीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. या सभेला शरद पवार यांनीही मागदर्शन करत मोदींवर हल्लाबोल केला.

ठाकरे म्हणाले की, सुरतेचे दोन जण महाराष्ट्र लुटत आहेत, या गद्दारांचे दोन बापही महाराष्ट्राचे गद्दार आहेत पण या लुटारुंचा सुफडासाफ केल्याशिवाय, यांना नेस्तनाबूत केल्याशिवाय शांत बसणार नाही. मोदीजी, तुमच्या गुजरातमध्ये भटकता आत्मा शोधा, महाराष्ट्रात शोधू नका. भवानी मातेबद्दलचा आकस मला धाराशिवमध्ये पाहायला मिळाला हा आकस गाडून टाकायचा आहे, असाही हल्लाबोल ठाकरेंनी केला.

ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मशाल ही निशाणी नाही तर धगधगती आत्मा आहे. त्याला कोणी हात लावेल तर भस्मसात व्हाल, कोरोना काळात सांगत होतो या व्हायरसपासून दूर रहा, आज सांगतो भाजपच्या व्हायरसपासून दूर रहा असे आवाहन त्यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!