मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उन्हाळा चांगलाच तापत असल्याने अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच एक्सप्रेसला किरकोळ आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी दादर रेल्वे स्थानकात घडली. विदर्भातून अमरावती एक्सप्रेस मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकात आली. अमरावती एक्स्प्रेस दादर रेल्वे स्थानकात आल्यानंतर तिला किरकोळ आग लागली. एक्स्प्रेसच्या ब्रेकमधून धूर निघू लागला. ही घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं.
सविस्तर वृत्त असे कि, एक्सप्रेसला किरकोळ आग लागल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रवाशांना गाडीतून बाहेर काढले. एक्स्प्रेसच्या कोचमधून धूर लागल्याने यंत्रणा सतर्क झाली. त्यानंतर तातडीने या आगीवर यश मिळविण्यास यश आलं. एक्सप्रेसच्या कोचमधून धूर लागल्याने प्रवाशांना उतरवलं. त्यानंतर आगीवर तातडीने नियंत्रण मिळवून अमरावचीच्या दिशेने ट्रेन रवाना करण्यात आली. अमरावती एक्स्प्रेसच्या बी ९ कोच मधून धूर येत असल्याचं लक्षात येताच यंत्रणा सक्रिय झाल्या. त्यांनी या किरकोळ आगीवर नियंत्रण मिळवलं.






