---Advertisement---

दुर्देवी : दुचाकीने जाताना हृदयविकारचा झटका आल्याने शिक्षकाचा मृत्यू

By team
On: May 8, 2024 5:28 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : प्रतिनिधी

तालुक्यातील हंजगी येथील जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मीकी बालक प्राथमिक आश्रम शाळा हंजगी येथील सहशिक्षक कै चनबसप्पा तुकशेट्टी ( वय वर्षे ४७ ) यांचे आज अक्कलकोट येथे सकाळी १० वाजता ह्रदयविकारच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले आहे.

आज सकाळी घरी अंघोळ करुन समता नगर येथून अक्कलकोट शहरात जात असताना चालत्या मोटार सायकलवरच कै चनबसप्पा तुकशेट्टी सर यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ते गाडीवरून खाली कोसळले. तेव्हा परिसरातील लोक कै चनबसप्पा तुकशेट्टी सर यांना पाहून गाडीत घालून श्री स्वामी समर्थ हाॅस्पीटल येथे घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या राहत्या गावी किणीवाडी गावावर तसेच अक्कलकोट शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात आई,पत्नी,एक मुलगा,एक मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६ वाजता किणीवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!