ध्यास विश्वसार्ह बातमीचा

५८ हजार रुपयाच्या कांदा लागवडीतून घरी घेऊन आला केवळ ५५७ रूपये

कुरनूरच्या शेतकऱ्याला कांद्याने रडवले

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

सध्या कांद्याच्या दराचा प्रश्न चिघळला आहे. कांदा निर्यात बंदीमुळे अनेक शेतकरी संतप्त आहेत. कांद्यावरून अनेक वेळा राज्यातील राजकारण ढवळले आहे.कांद्याला योग्य प्रकारे भाव मिळत नाही यासाठी शेतकरी आंदोलन करत आहे सरकारवर शेतकऱ्यांचा रोष आहे. मध्यंतरी गुजरात मधील कांदा निर्यात बंदी हटवली परंतु महाराष्ट्र मध्ये कांदा निर्यात बंदी होती. त्यामुळे सुद्धा सत्ताधाऱ्यांवर विरोधकांसह शेतकरी नाराज आहेत. अशातच अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गावातील शेतकऱ्याची अशीच दैनिय अवस्था कांद्याबद्दल झाली आहे.

मारुती उमाकांत खांडेकर असे या शेतकऱ्याचे नाव असून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा विक्रीला घेऊन गेले असता सर्व खर्च जाऊन ५५७ रुपये फक्त या कांद्यामध्ये नफा या शेतकऱ्याला मिळाला आहे त्यामुळे या शेतकऱ्याला अक्षरशः कांदा रडवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कसे जगायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूण २४ पाकीट मारुती खांडेकर या शेतकऱ्यांनी विक्रीला नेले होते.२८६६ कांद्याची पट्टी आली आणि त्यातून हमाल, भाडे असे सर्व खर्च मिळून २३०९ रू वजा झाले आणि यातून केवळ ५५७ रूपये या शेतकऱ्याला मिळाले आहेत.या कांद्याचा लागवडीचा खर्च ५८ हजार रुपये आहे शेतकऱ्यांना मात्र अत्यंत कमी नफा मिळाल्याने शेतकऱ्यांमधून अश्रू येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार काय योजना करणार, आणि कशाप्रकारे भाव देणार, शेतकऱ्यांचे अश्रू कोण पुसणार, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

घरातील सोने ठेवून कांद्याची लागवड केली
घरातील सोने ठेवून कांद्याची लागवड केली मात्र त्यातून काहीच फायदा झाला नाही असे म्हणत शेतकऱ्याने सरकारवर रोष व्यक्त केला आहे. निवडणुका जोरात चालू आहेत राजकीय नेत्यांना निवडणुकीमध्ये लक्ष देण्यासाठी वेळ आहे मात्र शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी यांच्याकडे वेळ नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्याला अशाप्रकारे जर नफा मिळत असेल तर शेतकऱ्यांना कसे जगायचे? मुलांच्या शिक्षणाचा खर्च, लोन, गाडीचे हप्ते, वैयक्तिक खर्च, शेतीच्या लागवडीचा खर्च, असे अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे त्वरित सरकारने लक्ष द्यावे.
* मारुती खांडेकर, शेतकरी

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!