---Advertisement---

सांगोला : जीपचा टायर फुटला, ३ महिला ठार

By team
On: May 12, 2024 9:54 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

जिल्ह्यातील सांगोला येथे कर्नाटकातील महिलांना द्राक्ष बाग कामासाठी घेऊन जाणाऱ्या जीपचा मागील टायर फुटल्याने जीप उलटून झालेल्या अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या, तर दहा महिला जखमी झाल्या. हा अपघात शनिवारी सकाळी सांगोला-जत रोडवर झाला.

सविस्तर वृत्त असे कि, गीता रवींद्र दोडमणी (वय ३९) महादेवी श्रीशैल्य चौगुला (४०, दोघीही रा. बाळीगेरी, ता. अथणी, जि. बेळगाव) व कस्तुरी शंकर भिरडे (६४, रा. मलाबाद, ता. अथणी) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात दहा महिला जखमी झाल्या आहेत. याबाबत जीपचालकावर गुन्हा दाखल झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, कर्नाटकातील दोन गावांतील महिला मजूर एका जीपने शनिवारी सकाळी कासेगाव (ता. पंढरपूर) येथे तुकाराम मोटे यांच्या शेतात कामासाठी निघाल्या होत्या. भरधाव जीपचा टायर फुटून जीप तीनवेळा उलटली. अपघातानंतर महिला आरडाओरडा करू लागल्या. बहुतांशी महिला जीपचे दरवाजे उघडून बाहेर फेकल्याने गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधिकारी आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!