---Advertisement---

तुम्हाला मुंडे साहेबांची शपथ आहे ; मुंडेंनी केली संयम राखण्याची विनंती

By team
On: June 10, 2024 9:31 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

तुम्हाला शपथ आहे, मुंडे साहेबांची… माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा… आई-बापाला दुःख देऊ नका, त्यांच्या जीवाला घोर लावू नका, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थक तरुणांना केले. अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो, तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात. शांत व सकारात्मक राहा, अशा शब्दांत त्यांनी संयम राखण्याची विनंती केली आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यालाखो लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. काही ठिकाणी तर तरुणांनी स्वतःचे जीवन संपवले तर अनेक गावांत चुली न पेटवता अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या साऱ्या घटना कानावर आल्यानंतर पंकजा मुंडे प्रचंड व्यथित झाल्या आहेत. येस्तार (अहमदपूर) येथील सचिन कोंडीराम मुंडे या आत्महत्या केलेल्या तरुणाच्या नातेवाईकांशी पंकजा यांनी शनिवारी रात्री दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले व धीर दिला. यासंदर्भात पंकजांनी एक्सवर ट्विट करून तरुणाईला कळकळीचे आवाहन केले आहे. स्वतःच्या जीवाला धक्का तोच लावेल ज्याला माझ्यावर प्रेम किंवा श्रद्धा नाही. मी लढत आहे, संयम ठेवत आहे. तुम्हीही सकारात्मकता दाखवा आणि संयमाने राहा. कोणी माझ्यासाठी जीव देणे कळतेय का किती कठीण आहे माझ्यासाठी? मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे. लोकसभेचा पराभव मी स्वीकारला आणि पचवला आहे, तो तुम्हीही पचवा ! अंधाऱ्या रात्रीनंतर सुंदर प्रकाश असतो. तुम्ही माझ्या जीवनातील प्रकाश आहात. शांत व सकारात्मक राहा, माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा. कृपा करून आपल्या आई-बापाला दुःख देऊ नका. तुम्हाला शप्पथ आहे मुंडे साहेबांची. १५ जूनपासून मी आभार दौरा करत आहे. तोपर्यंत सर्व जण प्रतीक्षा करा

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!