---Advertisement---

देशातील जनता स्वाभिमानी तर… ; सुप्रिया सुळे आक्रमक

By team
On: June 10, 2024 1:14 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

पक्षाच्या फुटीनंतर आज पहिल्यांदाच पुणे येथे राष्ट्रवादीचा २५ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्ते आणि जनतेनं आम्हाला साथ दिली, असे म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

देशातील धनशक्तीला जनतेनं नाकरलं आहे. संविधानानेच देश चालेल हे जनतेनं सिद्ध करून दाखवलं. ५० खोके एकदम ओके हे सरकारला लागू होत असेल पण जनतेला नाही. देशातील जनता स्वाभिमानी आहे, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

पुण्यातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. येथे प्रशासनच नाही. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुण्याची आण, बाण, शान गेली आहे. खून, गाड्या फोडणे अशा घटना रोजच घडत आहेत. याविरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेल, असे खासदार सुळे म्हणाल्या.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!