ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आता सात-बारावर लागणार आईचे नाव ?

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील भूमी अभिलेख विभागाने आईचे नाव सात-बारावर लावण्याचा निर्णय घेतला असून, ही प्रक्रिया डिसेंबर महिन्यापासून प्रत्यक्षात सुरू करण्यात येणार आहे.

यासाठी राज्य शासन ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणार आहे. अर्थात आईचे नाव सात-बारावर दाखल करण्यापूर्वी संबंधित कुटुंबातील आईचे नाव हेच आहे का याची खातरजमा करण्यासाठी तलाठी संपूर्ण कुटुंबाला बोलावू शकतो. तसेच आईचे नाव तपासण्यासाठी तलाठ्यांना कसरत करावी लागणार आहे.

राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने महिलांच्या नावाचा अर्थात आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्याच अनुषंगाने एक मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन, सदनिका खरेदी केल्यास आईच्या त्याच्या नावासह नावाचा उल्लेख करण्यात सात-बारावर आईचे नाव येणार आहे. त्या संदर्भात आता संगणक प्रणाली राबविण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!