---Advertisement---

शेतकर्‍यांमध्ये आनंद : टोमॅटोचे भाव वाढणार

By team
On: June 18, 2024 2:54 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महागाई मोठ्या प्रमाणात होत असतांना नुकतेच बाजारात टोमॅटोने चांगलाच भाव येवू लागला आहे. जुन्नरच्या नारायणगाव उपबाजारात एका कॅरेटला 700 रुपयांच्या वर उच्चांकी दर मिळू लागला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर इतर भाजीपाल्याची आवक कमी झाली असून दरात मोठी वाढ झाली आहे.

आंबेगाव तालुक्यातील मंचर, घोडेगाव, कळंब, नारोडी, पिंपळगाव, खडकी, निरगुडसर, भराडी, पारगाव, काठापूर भागात टोमॅटोच्या बागा बांधणीची कामे जोरात सुरू आहेत. उन्हाळी हंगामात टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले गेले आहे. परंतु, सुरुवातीला बाजारभावाची साथ मिळाली नाही. अनेक शेतकर्‍यांनी बागा सोडून दिल्या. आता मात्र टोमॅटोच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. येथील टोमॅटोला उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.

पाऊस आणि टोमॅटोची घटलेली आवक यामुळे नारायणगाव बाजार समितीत टोमॅटोला आता उच्चांकी बाजारभाव मिळत आहे. मागील 2 दिवसांपासून एक नंबर टोमॅटोच्या 20 किलोच्या कॅरेटला तब्बल 800 रुपयांपेक्षा जास्त दर मिळाला आहे. तर सरासरी हा भाव 600 ते 900 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी आनंदी आहेत.
दीड एकरमध्ये टोमॅटोचे पीक घेतले आहे. अंदाजे एकरी 3 लाख रुपये खर्च आला आहे. सध्या बाजारात टोमॅटोला 80 ते 90 रुपये किलोला भाव मिळू लागला आहे. आत्तापर्यंत 4 ते 5 तोडे झाले असून लागवडीचा खर्च वसूल झाला आहे. आतापर्यंत टोमॅटोचे 700 कॅरेट गेले असून अजून सरासरी 2 हजार कॅरेट उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!