ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजपला मोठा धक्का : विधानसभा निवडणुकीपूर्वीचा माजी केंद्रीय मंत्र्यांनी दिला राजीनामा

मुंबई : वृत्तसंस्था

देशात लोकसभा निवडणुक संपली असून आता राज्यात विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असतांना महाविकास आघाडी व महायुती आता उमेदवारांची चाचपणी सुरु असतांना भाजपला विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याची तयारी केली आहे. त्यांचा आज किंवा उद्या पक्षप्रवेश होईल असा दावा केला जात आहे.

सूर्यकांता पाटील यांनी 2014 मध्ये भाजपत प्रवेश केला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतील. सूर्यकांता पाटील गत काही दिवसांपासून भाजपवर नाराज होत्या. त्यामुळे त्यांनी शनिवारी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या राजीनामा पत्रात त्यांनी मागील 10 वर्षांत भाजपमध्ये खूपकाही शिकल्याचे म्हटले होते. तसेच त्याबद्दल भाजपचे आभारही मानले होते.

मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा तथा माझ्या हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा देत आहे. आपल्या सोबत गेल्या 10 वर्षांत खूप काही शिकता आले. तालुक्यात बुथ कमिटीपर्यंत काम केले. आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली व भारतीय जनता पार्टीची अत्यंत आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे. प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला. पण आपल्या व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नाही. कोणतीही कटुता मनात न ठेवता राजीनामा देत आहे, तो स्वीकारावा ही नम्र विनंती, असे सूर्यकांता पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलेल्या आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!