ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हाकेंच्या आंदोलनाला मोठे यश : सर्व पक्षीय नेत्याची होणार बैठक

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु असतांना नुकतेच आता ओबीसी आंदोलनाला मोठे यश मिळताना दिसून आले आहे. मराठा समाजाचा सरसगट ओबीसीमध्ये समावेश करण्याच्या मागणीला ओबीसी समाजाच्या वतीने विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्वा पार्श्वभूमीवर ओबीसी आंदोलनाला शांत करण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनादरम्यान 29 जून रोजी ओबीसी समाजाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीतील सर्वच पक्षांच्या भूमिकेकडे आता राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाचे लक्ष लागले आहे.

या सर्वपक्षीय बैठकीसाठी सर्व पक्षांच्या प्रमुखांना बोलवण्यात आले आहे. तसेच राज्यातील ओबीसी नेते आणि प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडताना आपल्या विविध मागण्या राज्य सरकारच्या शिष्टमंडळासमोर ठेवल्या होत्या. त्या सर्व मागण्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांचे मत ऐकल्यानंतर राज्य सरकार त्यांची भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे मराठा आंदोलनादरम्यान देखील अशाच प्रकारची सर्वक्षीय बैठक राज्य सरकारच्या वतीने बोलावण्यात आली होती.

राज्यात मराठा समाजाच्या आंदोलनामुळे राज्यातील ओबीसी समाज नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट मनोज जरांगे उपोषण करत असलेल्या ठिकाणाच्या अगदी जवळ वडीगोद्री येथे त्यांच्या विरोधातच उपोषण सुरू केले होते. सरकारच्या वतीने आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार आता प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचसाठी या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रा. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचे यश असल्याचे मानले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!