ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…हे तर महागळती सरकार ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारचे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करीत पायऱ्यावर आंदोलन सुरु केले होते. त्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढविला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले कि, महायुती सरकार आहे. हे डबल इंजिन सरकार आहे. ही महागळती सरकार आहे. लिकेज सरकार आहे. राम मंदिराच्या गाभ्यात लिकेज झाले. पेपरही लिक होत आहे. यांना लाज लज्जा शरम नाही, उद्याचा घोषणांचा पाऊस पडेल. तो गाजर संकल्प असणार आहे. निधी खर्चच होणार नाही. घोषणा खूप झाल्यात. घोषणांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असतो. गेल्या दोन वर्षातील घोषणांची किती पूर्तता झाली हे खरेपणाने सांगितलं पाहिजे. हे खोके सरकार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्याला कळत आहे, राज्यातील शेतकरी परिस्थिती भोगत आहेत. निरोपाच्या अधिवेशनात सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता असून ते उद्याच करतील, ज्या योजना व घोषणा केल्या जातात त्यात आर्थिक तरतूद केली जाते. उद्या घोषणांचा पाऊस पडेल, पण निधीच दिला जाणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी,पहिल्याच पावसात राम मंदिरात झालेल्या वगळतीवरुन आणि देशभरातली पेपर फुटीवरुनही ठाकरेंनी मोदी सरकावरला लक्ष्य केले. राम मंदीराला गळती झाली, पेपर गळती झाली, असे म्हणत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, चंद्रकांतदादांनी मला चॉकलेट दिले. आता लोकांना चॉकलेट देऊ नका. आश्वासनाचे चॉकलेट देऊ नका. कुणीही यावे आणि गाजर दाखवू नका. जनता शहाणी आहे. उद्या काही घोषणा करणार असाल, लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना आणल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तिची अंमलबजावणी करायला देऊ नका. त्यांचे चंद्रपुरातील भाषण हिणकस होते, असे ठाकरेंनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!