मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडणारे राज्याचे दोन दिग्गज नेते उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे आज एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगू लागली आहे. आज विधानसभा पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता. पहिल्याच दिवशी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या भेटीगाठीनंतर भाजप आणि ठाकरे गटात जवळीक वाढल्याची तुफान चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यातील राजकारणात कट्ट्रर विरोध ठरलेले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज एकमेकांसमोर आले. दोघेही उद्धव ठाकरे-फडणवीस एकाच लिफ्टमधून सभागृहात गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे- फडणवीस लिफ्टजवळ एकमेकांशी बोलले. याच्यात काय चर्चा झाली याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. मात्र त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क- वितर्कांना उधाण आले आहे.
ठाकरे गट आणि भाजपमधील वाढती जवळीक बघता राज्यातील राजकारणात परत उलटापालट होणार असल्याची शक्यता वर्तवलीय जात आहे. आज सकाळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांना चॉकलेट सुद्धा दिलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची झालेली भेट पाहत अनेक कवयास लावले जात आहेत. परंतु या भेटीमधून कोणताच अर्थ काढू असं भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा परिसरात उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचीही भेट झाली. उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. ही भेट योगायोगानं झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे अतुल भातखळकर यांनी दिली आहे.