---Advertisement---

झारखंड हादरले! पतीला बांधून पत्नीवर १७ जणांकडून बलात्कार

On: December 10, 2020 5:33 PM
Follow Us:
---Advertisement---

 

रांची :  सामूहिक बलात्काराच्या घटनेने झारखंड पुन्हा हादरली आहे. झारखंडमध्ये मंगळवारी (8 डिसेंबर) दुमका जिल्ह्यातील घांसीपूर गावात एका महिलेवर 17 जणांनी सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी महिलेच्या पतीला बांधून त्यांच्यासमोरच त्यांच्या पत्नीवर अत्याचार केले. यानंतर सर्व आरोपी फरार आहेत. मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असून, त्याचा तपास करत आहोत, असे सांगितले. या प्रकरणी पोलिसांत बुधवारी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

 

बाजारहाटीसाठी तो पत्नीच्या सोबत गेला होता. खरेदी करून जवळपास आठ वाजता बाजारातून घरी परतत होते. तेव्हा रस्त्यात १७ जण मद्यधुंद अवस्थेत होते. त्यातील पाच जणांनी त्याला पकडून ठेवले आणि पत्नीला उचलून ते झुडपाच्या दिशेने घेऊन गेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला.

 

17 आरोपींपैकी आतापर्यंत केवळ एकाच आरोपीची ओळख पटली आहे. या आरोपीचं नाव रामू मोहली (गोलपूर) असं आहे. असं असलं तरी अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. या घटनेने संपूर्ण राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. दुमकाचे पोलीस उप महासंचालक सुदर्शन प्रसाद मंडल म्हणाले, “पीडित महिलेने सामूहिक बलात्कारीची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल होताच तपास सुरु केला आहे.” मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचं वय 35 वर्षे असून त्यांना 5 मुलं आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!