ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘अब की बार 225 पार’ ; शरद पवारांचे मिशन ठरलं

मुंबई : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आठ जण निवडून आले, आता लवकरच महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर होईल. तेव्हा 288 जागांपैकी 225 जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच, निवडणुका झाल्यावर राष्ट्रवादीत सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते येत आहेत, चित्र बदलायचे असेल तर राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी कार्यकर्ते येतात, ही चांगली गोष्ट आहे, असेही शरद पवार म्हणाले आहेत.

विधानसभा निवडणुकीत 288 पैकी 225 पेक्षा जास्त जागा येतील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. मुंबईच्या वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये ते बोलत होते. महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे. मात्र चित्र बदलण्याच्या दृष्टीने लोकसभा निवडणुकीत मतदारांनी कौल दिला, ही तर केवळ सुरूवात आहे, महाराष्ट्राचं राजकारण बदलेल अशी अपेक्षा असल्याचेही शरद पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बोलताना म्हणाले की, “महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात आहे, चित्र बदलवण्याच्या दृष्टीने लोकसभेत मतदारांनी निकाल दिला. 48 पैकी 31 लोकांना शक्ती देऊन वेगळा इतिहास घडवला. राष्ट्रवादीच्या 8 लोकांना निवडून दिले, ही सुरुवात आहे, 288 जागा आहेत, त्या जागांमधील 225 पेक्षा जास्त जागा निवडून येतील, महाराष्ट्रातील राजकारण बदलण्याची अपेक्षा आहे, कष्ट करणार, शक्ति देणार, राज्य आणुया, सत्तेत येत लोकांच्या जीवनात बदल आणण्याचा प्रयत्न करूयात, उद्योजक, व्यापारी असेल कोणताही घटक असेल देशात एक शक्तिशाली महाराष्ट्र राज्य निर्माण करू या असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!