छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु असतांना नुकतेच मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असून यावेळी एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पत्रकारांशी चर्चा करीत असतांना ते म्हणाले कि, मनोज जरांगे पाटलांचा प्रस्ताव आला तर मी पत्रकारांना सोबत नेऊन त्यांच्याशी चर्चा करेल, असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भविष्यात जरांगेंनी खरेच ओवैसींपुढे एखादा प्रस्ताव ठेवला तर अवघ्या महाराष्ट्राचे समीकरणच बदलून जाईल असा दावा केला जात आहे.
असदुद्दीन शनिवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारशी झगडणाऱ्या मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करण्याचे संकेत दिले. ते म्हणाले की, मनोज जरांगेंचा प्रस्ताव आला, तर मी पत्रकारांना सोबत नेऊन त्यांच्याशी चर्चा करेन. त्यांच्यामुळे बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. पण मुस्लिम का जिंकत नाहीत. त्यांनी पुढाकार घेतला तर आम्ही निश्चितच चर्चा करू, असे ते म्हणाले.
असदुद्दीन ओवैसी पुढे बोलताना म्हणाले की, मी मनोज जरांगेंचा आदर करतो. त्यांचे कौतुक करतो. त्यांच्यामुळे लोकसभा निवडणुकीत 8 खासदार निवडून आले. पण एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. सर्व समुदायाचे उमेदवार जिंकतात, पण मुस्लिमांचे जिंकत नाहीत. इम्तियाज जलील यांच्या पराभवामुळे महाराष्ट्रातील मुस्लिम समाजात रोष आहे. आमचा एकमेव उमेदवारही पडल्याचे आम्हाला दुःख आहे. मुस्लिमांनी सर्वांना मतदान केले, पण त्यांना कुणीही केले नाही. यावर मुस्लिमांनी विचार करावा, असे ओवैसी म्हणाले.
असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी आपल्या पक्षातील गद्दारांवर योग्य ती कारवाई करण्याचाही इशारा दिला. महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवार निवडून आला नाही. आमचा एक उमेदवार होता, त्यालाही सर्वांनी मिळून पाडले. आम्ही सर्वांना मते दिली. त्यानंतरही आमचा उमेदवार पाडला. प्रत्येक ठिकाणी गद्दार राहतात. आपला माणूस जिंकू नये असे त्यांना वाटते. या गद्दारांविषयी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.