ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आदेश भाऊजींनी खुलविले महिलांच्या चेहऱ्यावर हास्य ; श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा उपक्रम !

अक्कलकोट : प्रतिनिधी

श्रीक्षेत्र अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळामुळे सांस्कृतिक वारसा लाभला असून, उपस्थित माता भगिनींच्या चेहर्यातवरील आनंद पाहून भरून भारावलो अशी प्रतिक्रीया सुप्रसिध्द अभिनेते आदेश बांदेकर यांचा खेळ मांडियेला कार्यक्रमाच्या वेळी मनोगतातून व्यक्त केले. महाराष्ट्रभर गाजलेले लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर यांच्या कार्यक्रमासाठी महिलांची अक्षरशः झुंबड पडली होती. दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याच्या हेतुने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ते श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३७ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सव न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, शनिवार दि. १३ जुलै रोजी सायंकाळी ७ वा. अभिनेते आदेश बांदेकर प्रस्तुत ‘खेळ मांडीयेला’ (खेळ, किस्से, गप्पा, साऱ्या कुटुंबासाठी) ह्या कार्यक्रमाने तिसरे पुष्प संपन्न झाले. याप्रसंगी आदेश बांदेकर बोलत होते. यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. कार्यक्रमाचे सुरुवात गणेश वंदनाने करण्यात आली.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन श्री राजेराय मठाचे अध्यक्ष अँड.शरदराव फुटाणे-जाधव, हिरकणी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.अलकाताई भोसले, सचिवा अर्पिताराजे भोसले, सौ.वैशाली लिंबीतोटे, माजी नागराधाक्षा अनिता खोबरे, उपाध्यक्षा रत्नमाला मचाले, न्यासाचे क्रियाशील सदस्य सरोजिनी मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी लकी ड्रॉचे कुपन देण्यात येत होते. मंचावर महिलांसह विविध खेळ, गप्पा, चर्चा करत कार्यक्रम मोठ्या उत्साहात मंगलमय वातावरणात पार पडला. विजेत्या महिलांना मानाच्या ५ पैठणी, २०० घड्याळ पारितोषिक म्हणून देण्यात आले.

महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावेत या अनुषंगाने महाराष्ट्रभर गाजत असलेले लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळ मांडियेला संपन्न झाला. शेकडो माता-भगिनींनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. सुप्रसिध्द अभिनेते आदेश बांदेकर व कलाकार यांच्यासह मान्यवरांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व संजय कुलकर्णी यांच्या हस्ते मंत्र पठणाने पूजन संपन्न झाले.

यावेळी हिरकणी संस्थेच्या जयश्री मगर, स्वाती निकम, स्मिता कदम, पल्लवी नवले, कविता वाकडे, क्रांती वाकडे, संगीता भोसले, अंजना पवार, उज्वला भोसले, कोमल क्षीरसागर, सुवर्णा घाडगे, छाया पवार, रुपा पवार, माजी नगरसेविका अरुणा पवार, आरती पोतदार, चारुशीला कुलकर्णी व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, बाबुराव कुलकर्णी, विश्वस्त भाऊ कापसे, संतोष भोसले, राजेंद्र लिंबीतोटे, ओंकारेश्वर उटगे, अॅड.संतोष खोबरे, दिलीप सिद्धे, शिवराज स्वामी, राजू इंगळे, शुभम इंगळे, मनोज निकम, प्रा.शरणप्पा आचलेर, राजेश माने कोल्हापूर, अरविंद शिंदे, शीतल फुटाणे, राजु नवले, निखील पाटील, प्रवीण घाडगे, गोटू माने, सौरभ मोरे, अमित थोरात, बाळासाहेब घाटगे, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण, श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी रसिकप्रेक्षकांचे स्वागत व आभार मानले. उत्कृष्ठ लाईट व्यवस्था शंभूराजे इलेक्ट्रिकल यांनी केले.

 

अन्नछत्र मंडळ हे सुंदर व पवित्र ठिकाण :
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे सुंदर व पवित्र ठिकाण असून, सेवा करण्याची संधी मला लाभली. या कार्यक्रमा नंतर अमेरिकेतील १२ शहरात हा कार्यक्रम करण्याची संधी मला मिळालेली आहे. २० वर्षाच्या होम मिनिस्टर नंतर ‘खेळ मांडीयेला’ ह्या कार्यक्रमाने १५ लाख कि.मी.चा प्रवास पूर्ण होणार आहे.
-अभिनेते आदेश बांदेकर

गुणीजन गौरव : सौ.लता कुलकर्णी –आदर्श माता, सौ.पूनम माने – कार्यकारी अभियंता, गुण नियंत्रण विभाग कोल्हापूर, श्रीमती अहिल्या इंगळे – जि.प.शाळा कोन्हाळ्ळी यांचा न्यासाच्या वतीने गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थी गौरव :
तालुक्यातील इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला.

दि. १४ जुलै रोजी रविवार सायंकाळी ७ ते रात्रौ ९.३० पर्यंत परमपूज्य मौनतपस्वी श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या शुभाशिर्वादाने सादरकर्ते कर्नाटकचे ख्यातनाम गायक राजेश कृष्णन व प्रसिध्द निवेदिका अनुश्री व अनुपम गौड आणि सहकारी बेंगळूर यांचा ‘संगीत संजे’ कन्नड कार्यक्रम सादर होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!