---Advertisement---

अन्नछत्र धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर न्यास : सुशिल जाधव

On: December 12, 2020 4:03 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तर न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले सामाजिक एकमेव न्यास असल्याचे मनोगत वित्तीय क्षेत्रात अग्रणी असेल्या लोकमान्य सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशिल जाधव यांनी व्यक्त केले.

 

सुशिल जाधव हे तीर्थक्षेत्र अक्कलकोट  येथे आले असता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार केले. याप्रसंगी योगीराज ते बोलत होते.

 

कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर न्यासाकडून विविध उपक्रम हे उल्लेखनीय असल्याचे सांगून जाधव यांनी न्यासाचे कौतुक केले.

 

यावेळी बाळा घाटगे, नामदेव भोसले, समर्थ घाटगे यांच्यासह स्वामीभक्त, सेवेकरी, कर्मचारी उपस्थित होते. कोरोनामुळे न्यासाकडून नियमांची कडक अंमलबजावणी बाबत कौतुक व समाधान होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!