ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिक्षण मंत्र्यांचा महत्वाचा निर्णय : प्रत्येक शाळेला केला नवा नियम

मुंबई : वृत्तसंस्था

बदलापूरमधील शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुली, महिलांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी सांगितले की, शाळांमध्ये सीसीटीव्हींप्रमाणेच सुरक्षिततेसाठी पॅनिक बटणदेखील बसवले जाऊ जाऊ शकते. हे पॅनिक बटण दाबल्यानंतर पोलिसांनी लगेच गैरप्रकाराची माहिती कळेल.

“…शाळांमध्ये जसे सीसीटीव्ही आहेत; तसे महिलांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटणची व्यवस्था केली जाऊ शकते… हे पॅनिक बटण वसतिगृहातही बसवता येऊ शकते. हे एक प्रगत तंत्रज्ञान आहे.” असे केसरकर मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. “मुंबई विभागीय उपसंचालकांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने बदलापूर घटनेचा तपास केला. विविध विभागातील लोकांचा या तपास कामात सहभाग राहिला. कोणत्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करायचे याचा निर्णय पोलिस घेतील. ज्यांचा निष्काळजीपणा आढळून आला आहे; ते आता सहआरोपी म्हणून असतील. त्यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतील,” असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, विरोधकांचा समाचार घेताना केसरकर म्हणाले, “आता जे टीका करत आहेत; त्यांनी त्यांच्या कार्यकाळात काहीही केले नाही. आम्ही अनेक उपाययोजना केल्या आहेत.”

बदलापूरमधील शाळेतील दोन मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी महिला आणि बालकल्याण विभाग आणि शिक्षण मंत्रालयाने तयार केलेला अहवाल सोमवारी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!