ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तब्बल ११ वर्षांनंतर आसाराम बापू जेलमधून बाहेर…

मुंबई : वृत्तसंस्था

अल्पवयीन मुलीवर अत्‍याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू ११ वर्षांनंतर मंगळवारी जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. वास्तविक, त्याला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील रुग्णालयात हृदययाच्या संबंधित उपचारासाठी आणण्यात आले आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने बापूला उपचार घेण्याची परवानगी दिल्यानंतर दोन आठवड्यांनंतर त्यांना आयुर्वेदिक रुग्णालयात आणण्यात आले.

एका पोलिस अधिकाऱ्याने आज (बुधवार) सांगितले की, २०१३ च्या सप्टेंबर महिन्यात अटक करण्यात आलेल्या (८३ वर्षीय) आसारामला (मंगळवार) रात्री ८ वाजता खोपोली येथील आयुर्वेदिक रुग्णालयाच्या बहुविद्याशाखीय कार्डियाक केअर क्लिनिकमध्ये पूर्ण पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. पुढील सात दिवस बापूंवर हृदयविकारावर रुग्णालयात उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

13 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने आसाराम बापूला सात दिवसांच्या पोलीस कोठडीत महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती. पॅरोल मंजूर करताना हायकोर्टाने काही अटी घातल्या होत्या ज्यात त्याच्यासोबत प्रवासात चार पोलिस असतील आणि त्याच्यासोबत दोन अटेंडंट ठेवण्याची परवानगीही दिली होती. त्यांना पुण्यातील एका खासगी कॉटेजमध्ये ठेवण्यात येणार असून, उपचार, वाहतूक आणि पोलिस बंदोबस्ताचा संपूर्ण खर्च त्यांना करावा लागणार आहे.

जोधपूर पोलिसांचे एक पथक दोन अटेंडंट यांना फ्लाईटने मुंबईला आणण्यात आले. येथून त्‍यांना खोपोली येथील एका रूग्‍णालयात आणण्यात आले. अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षेसाठी रूग्‍णालयात रायगड पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. 1 सप्टेंबर 2013 रोजी त्याच्या अटकेनंतर ही पहिलीच वेळ आहे की कोर्टाने त्याची याचिका स्वीकारली आहे. आरोग्याच्या कारणास्तव शिक्षेला स्थगिती देण्याची आसारामची याचिका उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी फेटाळली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!