---Advertisement---

घरात घुसून मारेन ; भाजप नेते राणे यांची पोलीसांसमोर धमकी

By team
On: August 28, 2024 2:32 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते व भाजप नेते नारायण राणे यांच्यात वाद उफाळून आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी राजकोट किल्ल्याला भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. यावेळी शिवसेनेचा ठाकरे गट व भाजप नेते नारायण राणे यांचे कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यांच्यात धक्काबुक्की झाली. नारायण राणे यांनी मविआच्या कार्यकर्त्यांना घरात घुसून ठार मारण्याची उघड धमकी दिली. यामुळे येथीली स्थिती चांगलीच चिघळली होती.

भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे बुधवारी दुपारी 12 च्या सुमारास राजकोट किल्ल्यावर दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र नीलेश राणेही उपस्थित होते. त्याचवेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही उपस्थित होते. त्यांनी नारायण राणे यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यानंतर राणे पुढे निघाले. त्याचवेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी पोहोचले. त्यांच्यासोबत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आदी नेते उपस्थित होते. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व महबूब शेखही यावेळी तिथे होते.

आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी येताच राणे समर्थकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर ठाकरे समर्थकांनीही प्रत्युत्तरादाखल घोषणाबाजी केली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. यामुळे किल्ल्यावर प्रचंड तणाव निर्माण झाला. या स्थितीतच आदित्य ठाकरे यांनी किल्ल्यावर जाऊन स्थितीची पाहणी केली. यावेळी नीलेश राणे यांनी पोलिसांविरोधात चांगलीच आक्रमक भूमिका घेतली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!