---Advertisement---

सुलतानपूर येथे दोनशे जनावरांसाठी लाळ खुरकत लसीकरण शिबिर

On: December 18, 2020 10:15 AM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील सुलतानपूर येथे ग्रामपंचायतीच्यावतीने जनावरांना लाळ खुरकत लसीकरण शिबिर घेण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन सुलतानपूरचे सरपंच मल्लमा स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. धनाजी गिडडे, डॉ. संतोष कराळे, डॉ.हुमायु पटेल,सहाय्यक रजनीकांत रंगदाळ यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दोनशे जनावरांना लसीकरण करण्यात आले.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नराळे व तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. टी.टी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपसरपंच नागनाथ बिराजदार यांच्यासह पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!