---Advertisement---

चंद्रकांत दादांचे मुक्के घ्यायला पाहिजे ! मनोज जरांगेंचा हल्लाबोल

By team
On: October 28, 2024 3:15 PM
Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई वृत्तसंस्था 

विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मनोज जरांगे देखील उतरले आहेत. पण सध्या मनोज जरांगे पाटील यांनी भाजपविरोधात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर सुद्धा टीका केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर आता अनेक मुद्यांवर एकमेकांवर थेट हल्ले होते आहे. आमचं काय चुकलं ते मनोजदादांनी एकदा सांगावं, असं वक्तव्य चंद्रकांत दादांनी केलं होते. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर पण हल्लाबोल केला.

चंद्रकांत दादा पाटलांचे काही चुकलं नाही. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. शेतकर्‍यांच्या मालाला भाव दिला. शेतकर्‍याला आत्महत्या करायला लावल्या, मराठ्यांना आत्महत्या करायला लावल्या, दहा वर्षांपूर्वीच त्यांनी धनगर समाजाला आरक्षण दिले. म्हाडाचे घरकुल गरीबांना द्यायचे ते त्यांनीच घेतले. खूप चांगले काम केले आहेत त्यांनी. मराठ्यांना आरक्षण न देता ओबीसींना दिलं हे चांगलं काम केलं. परत मराठ्यांना SCBC आरक्षण देऊन EWS मध्ये घातलं छान काम आहे. दादांचे मुक्के घ्यायला पाहिजे सगळ्यांनी, लय चांगले काम केले आहे त्यांनी. मराठ्याच्या पोरावर केसेस केल्यात, महिलांना बंदुकीने ठोकलं, गोळ्या घातल्या काय चांगलं काम केलं. देव माणूस आहे दादा, शेंदूर लावायला पाहिजे कोणी फक्त दादाला शेंडी ठेवली पाहिजे उघडी, अशी घणाघाती टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली.

हरियाणा पॅटर्न करणार आहेत ते पॅटर्न, छान काम करणार आहेत, सगळे पाडून घेणार आहेत, पुरे. देवेंद्र फडणीस यांचे रक्त कळत नाही कुणाचं आहे.सकाळी सकाळी म्हणतात मी हिंदू आहे. दुपारी म्हणतात मी OBC चा DNA, तिसर्‍या प्रहरी म्हणतात पुरोगामी रक्त आहे. भाजपानं, आरएसएसनं संपवलं सगळं, असे ते म्हणाले.

मराठा समाज एकत्र झाल्याने सगळ्याच पक्ष्यातील येत आहेत. रात्री दोन वाजले की, भाजपाचे सुद्धा असतात दिवसा सुद्धा येतात भाजप मधले तिकीट हुकलेले ते तर जाहीर आहेत आता .देवेंद्र फडणवीस यांनी फसवल्यामुळे सगळा मराठा समाज चिडलेला आहे. आम्ही ताकदीने बलाढ्य होतो. मात्र आम्हाला गिणतीत घेतले नव्हते. आता गोरगरीब मराठ्यांच्या चपलांसकट पाया पडत आहेत. आज सगळे नेते मराठ्यांना विचारायला लागले ही चांगली गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस घरात बसून गणित मांडतात. म्हणून वाटतं हा माणूस खूप छान आहे असं थोडी ढेरी मोठी आहे. नंतर भाजपच्या लोकांना वाटतं हे काय लफडं झालं म्हणून सांगतो हे आरएसएस संपवायला लागला हे भाजप संपवायला लागला. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे या राज्यातील भाजप संपेल दुसरे कोणामुळे नाही, असे जरांगे म्हणाले. देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर बसून जमत नसतं. आम्ही आरक्षण मागीतलं. आम्हाला दिलं नाही, आमच्या डोळ्यात देखत ओबीसींना दिलं. फडणवीस हे मस्तीत जगणारा माणूस आहे, त्यांनी मराठ्याला खुन्नस दिली आता मराठा तुम्हाला जुमानत, मानत नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!