---Advertisement---

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ५२ पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

By team
On: November 6, 2024 6:44 PM
Follow Us:
---Advertisement---

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुका तोंडावर असताना मोठा धक्का बसला आहे. धुळ्यातील तब्बल ५२ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत भाजपला पाठिबां दिलाय.

धुळे शहरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या 52 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला आहे. त्या ५२ जणांनी भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांना पाठिंबा दिला आहे. माजी आमदार अनिल गोटे यांना परस्पर उमेदवारी दिल्याने हे सर्व शिवसेना पदाधिकारी नाराज होते. गोटे यांनी अनेकवेळा शिवसेना पक्षावर जहरी टीका केल्यानंतर ठाकरे यांनी शिवसेनेची उमेदवारी दिल्याने पदाधिकारी नाराज झाले.

शिवसेना ठाकरे गटाला धुळ्यात हा जबर धक्का मानला जात आहे. भाजपात प्रवेश न करता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप उमेदवार अनुप अग्रवाल यांचा प्रचार करणार असल्याचे यावेळी नाराज पदाधिकारी महेश मिस्त्री यांनी स्पष्ट केले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!