---Advertisement---

प्रकाश आंबेडकरांची सोलापुरात शनिवारी तोफ धडाडणार

By team
On: November 7, 2024 8:15 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर वृत्तसंस्था 

 

सोलापूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवार ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा मागास सेवा मंडळ चंद्राम गुरुजी शिक्षण संकुल डीएड कॉलेज नेहरूनगर, विजापूर रोड, सोलापूर या ठिकाणी होणार आहे.

 

 

याबाबत जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी ही माहिती दिली.सोलापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांना जनतेला सुजाण बंधू आणि भगिनींना नागरिकांनी आपण या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभा मोठ्या प्रमाणात यशस्वी करावी असे आवाहन केले.

 

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार संतोषकुमार इंगळे यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. या ठिकाणी भाजप ,काँग्रेस,रासप व मनसे यांच्यासमोर आपले आव्हान उभे केले आहे. ग्रामीण भागात त्यांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!