---Advertisement---

पाथर्डीत भाजप महिला आमदारावर भयानक हल्ला

By team
On: November 21, 2024 2:54 PM
Follow Us:
---Advertisement---

अहमदनगर, वृत्तसंस्था 

काल राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले यावेळी काही ठिकाणी शांतात तर काही ठिकाणी वाद झाले. यावेळी पाथर्डीमध्ये मोठी घटना घडलीय.  पाथर्डीच्या आमदार आणि भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आमदार मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रकार आज सायंकाळी तालुक्यातील शिरसाठवाडी येथील मतदान केंद्रावर झाला. तर आक्रमक जमावापासून बचाव व्हावा म्हणून राजळे यांनी कार्यकर्त्यांसह स्वतःला मतदानकेंद्राच्या खोलीत कोंडून घेतले. उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी मोठा पोलीस बंदोबस्त घेत दोन तास मतदान केंद्रात बसून असलेल्या राजळे यांची सुटका केली तर या घटनेने संतप्त झालेल्या हजारो राजळे समर्थकांनी रात्री शहरातील माणिक दौंडी चौकात रास्तारोको आंदोलन सुरु केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेत राजळे आणि त्यांचे चार समर्थक किरकोळ जखमी झाले आहे.

 

नेमकं काय आहे प्रकरण ? 

या प्रकरणी मात्र राजळे यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने या संदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणत्याही गुन्ह्याची नोंद पोलीस स्टेशनला करण्यात आली नव्हती. या प्रकरणाने मात्र किरकोळ शाब्दिक चकमक वगळता शांततेत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेस गालबोट लागले. आज सायंकाळी राजळे या शिरसाठवाडी मतदान केंद्रावर वाद सुरु असल्याचे समजल्यावर त्या ठिकाणी गेल्या असता तेथे शेकडो युवक जमा झाले आणि त्यांनी राजळे यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. पोलिसांनी या तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न केला.  मात्र पोलिसदल अपुरे असल्याने उपयोग झाला नाही. या नंतर राजळे यांच्या दिशेने दगडफेक करण्यात आली. ती चालू असतानाच राजळे यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदानकेंद्राच्या खोलीत नेले. या वेळी मतदान प्रक्रिया संपलेली होती.

जवळपास एक तास या वेळी वीज गायब झाल्याने राजळे यांना काही काळ अंधारात बसावे लागले. दरम्यान या घटनेची माहित कळताच काही राजळे समर्थक शिरसाठवाडी कडे निघाले होते मात्र पोलिसांनी रस्त्यामध्ये अडवला कार्यकर्त्यांनी रस्त्यामध्येच रस्ता रोको सुरू केला.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!