---Advertisement---

विराट कोहली भारत सोडणार, ‘या’ देशात होणार शिफ्ट

By team
On: December 19, 2024 9:27 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली, वृत्तसंस्था 

टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीच्या फॅन्ससाठी मोठी बातमी आहे. विराट कोहली हा पत्नी अनुष्का शर्मा आणि दोन मुलांसह भारत सोडून लंडनला शिफ्ट होणार आहे, अशी माहिती विराट कोहलीचे लहानपणीचे क्रिकेट प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी दिली आहे. विराट कोहलीला लहाणपणी ज्या प्रशिक्षकांनी क्रिकेटचे धडे दिले, त्या राजकुमार शर्म यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत राजकुमार शर्मा यांना विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल विचारले असता, ते म्हणाले, विराट कोहलीचा फॉर्म हा चिंतेचा विषय नाही. आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पुढील दोन कसोटी सामन्यात भारतासाठी तो आणखी दोन शतके झळकावणार आहे,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

विराट त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रिकेट खेळत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने शतक झळकावले. मला विश्वास आहे की आगामी दोन कसोटी सामन्यांमध्ये तो आणखी दोन शतके झळकावणार आहे. त्याने नेहमीच आपल्या क्रिकेटचा आनंद लुटला आहे. त्याचा फॉर्म चिंतेचा विषय नाही. कठीण परिस्थितीत कशी कामगिरी करायची आणि आपल्या संघाला सामना जिंकण्यासाठी कशी मदत करायची हे त्याला माहीत आहे. तसेच विराट अजूनही तंदुरुस्त आहे आणि निवृत्ती घेण्याचे त्याचे वय झालेले नाही. मला वाटते की तो आणखी पाच वर्षे खेळेल. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात तो भारताकडून नक्कीच खेळेल. मी त्याला गेल्या 26 वर्षांपासून ओळखतो आणि म्हणूनच मी म्हणू शकतो की त्याच्यामध्ये अजूनही खूप क्रिकेट शिल्लक आहे असे शर्मा पुढे म्हणाले आहेत.

विराट कोहली लवकरच अभिनेत्री पत्नी अनुष्का शर्मा आणि वामिका आणि अकाय यादोन मुलांसह लंडनला शिफ्ट होण्याची योजना आखत आहे. त्यामुळे लवकरच तो भारत सोडून तिथे स्थायिक होणार आहे, अशी मोठी माहिती राजकुमार शर्मा यांनी दिली. त्यामुळे विराटच्या फॅन्सना मोठा धक्का बसला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!