---Advertisement---

दस्त नोंदणीसाठी शुक्रवार, शनिवारी दुय्यम निबंधक कार्यालय राहणार सुरू

On: December 23, 2020 3:41 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : राज्य शासनाने 31 डिसेंबर 2020 अखेर दस्त नोंदणी केल्यास 3 टक्के मुद्रांक शुल्कात सवलत दिली आहे. या सवलतीचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता यावा, दस्तऐवज नोंदणी व्हावी, यासाठी शुक्रवार आणि शनिवारी सुट्टीच्या दिवशी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक, सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार असल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी गोविंद गिते यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

शुक्रवारी ख्रिसमस आणि शनिवारी सुटी असल्याने जनहितार्थ कार्यालये सुरू ठेवण्यात येणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी दस्त नोंदणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गिते यांनी केले आहे

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!