अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहाने पार पडले. या स्नेहसंमेलनातून लहान मुलांनी विविध कलाप्रकार सादर करून पालकांसह ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. यासाठी शाळेने मोठी तयारी केली होती.या कार्यक्रमाचे उद्घाटन हन्नुरचे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांनी कलाप्रकार सादर केलेल्या आणि स्नेहसंमेलनात सहभागी झालेल्या मुलांचे कौतुक केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रंजना जगदाळे ह्या होत्या.यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष प्रविण मोरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नेताजी मोरे, गुलचंद्र मोरे, भालचंद्र मोरे, समर्थ जाधव, गणेश मोरे, राहुल मोरे, आनंद मोरे, महमद शेख,हर्षद मोरे,आकाश मोरे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी हादवे यांनी केले तर आभार अशोककुमार घोगरे यांनी केले.