पुणे : वृत्तसंस्था
देशभरात पेट्रोल-डिझेलचे दर नियमित वाढ होत असतांना आता चारचाकी घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. भारतात ग्राहक पेट्रोल-डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांच्या तुलनेत इलेक्ट्रिक कार्सला प्राधान्य देत आहेत. मागील काही वर्षात कार क्षेत्रात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आता भारतीय बाजारात पहिल्या सोलर कारची एन्ट्री झाली
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 इव्हेंटमध्ये अनेक शानदार कार्स, बाइक सादर केल्या जात आहेत. याच इव्हेंटमध्ये पुण्यातील इलेक्ट्रिक व्हीकल स्टार्ट-अप कंपनी Vayve Mobility ने देशातील पहिली सौर ऊर्जेवर धावणारी ‘Vayve Eva’ ही कार लाँच केली आहे.
Vayve Eva कारची किंमत
या कारची सुरुवाती एक्स-शोरूम किंमत केवळ 3.25 लाख रुपये आहे. ही कार 3 मीटरपेक्षाही लहान आहे. कारच्या Stella मॉडेलची किंमत 3.99 लाख रुपये आणि Vega मॉडेलची किंमत 4.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीचा दावा आहे की, कार सिंगल चार्जमध्ये 250 किमी अंतर पार करू शकते.
या कारमध्ये एक सोलर पॅनेल देण्यात आले आहे. या पॅनेलचा उपयोग सरूनफच्या जागी करता येईल. कंपनीचा दावा आहे की, ही देशातीलपहिली सोलर पॉवर्ड इलेक्ट्रिक कार आहे. कारद्वारे 1 किमी अंतर पार करण्यासाठी केवळ 80 पैसे खर्च येईल.
Vayve Eva चे डिझाइन आणि स्पेसिफिकेशन्स
कारमध्ये फ्रंटला सिंगल सीट आणि मागील बाजूला एक रुंद सीट दिली आहे. ड्राइव्हिंग सीटला 6 वेगवेगळ्या पद्धतीने एडजेस्ट करता येईल. याशिवाय, यात पॅनरोमिक सनरूफ आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा देखील मिळेल. कारमध्ये एसीसह अॅपल कारप्ले आणि अँड्राइड ऑटो कनेक्टिव्हिटी सिस्टम मिळेल. Vayve Eva मध्ये पुढील बाजूला इंडिपेंडेंट कोल स्प्रिंग सस्पेन्शन आणि मागील बाजूला ड्युअल शॉक सस्पेन्शन दिले आहे. याच्या पुढील बाजूला डिस्क ब्रेक आणि मागील व्हीलमध्ये ड्रम ब्रेक्स मिळतात. या कारची टॉप स्पीड ताशी 70 किमी आहे.
कारमध्ये 18Kwh लीथियम-ऑयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कार पूर्ण चार्ज होण्यासाठी केवळ 45 मिनिटं लागतात. यात लिक्विड कूल्ड इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला असून, जे 12kW पॉवर आणि 40Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये कार 250 किमी अंतर पार करेल.