अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
चपळगाव (ता.अक्कलकोट) येथील शासनमान्य स्वस्त धान्य दुकान काही तांत्रिक कारणांमुळे बावकरवाडी गावात हलविण्यात आले होते.यामुळे तब्बल २० वर्षे चपळगावातील गोरगरीब कुटुंबांना पाच किलोमीटर पायपीट करत बावकरवाडी येथून धान्य घेऊन यावे लागत असे.मात्र सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब पाटील यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हे स्वस्त धान्य दुकान चपळगाव विविध कार्यकारी सोसायटीकडे वर्ग केले आहे.
त्यामुळे चपळगावच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यानिमित्त आलेल्या नूतन मालाचे पूजन व वाटप सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब पाटील,व्हा.चेअरमन खंडप्पा वाले,माजी,चेअरमन नंदकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.प्रारंभी धान्यलक्ष्मी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून वाटपास सुरुवात करण्यात आली.यावेळी सोमनाथ बानेगाव, विवेकानंद हिरेमठ,राजकुमार भंगे,
दिलीप बुगडे,दयानंद फताटे,पंडित भुसणगे,कुमार दुलंगे,शरणप्पा ख्याडे, अंबण्णा दुलंगे,महादेव रामपूरे,सुभाष बुगडे,सुभाष हन्नुरे,चंद्रकांत पाटील, धनाप्पा डोळळे,काशिनाथ रामपूरे
आदी उपस्थित होते.चपळगाव हे जवळपास दहा हजार लोकसंख्येचे गाव असून यामध्ये गोरगरीब कुटुंबातील जनतेचा समावेश होतो.स्वस्त धान्य दुकान सोसायटीच्या माध्यमातून गाव पातळीवर आल्याने या कुटुंबांना आता मोठा आधार मिळणार आहे. व त्यांची पायपीट थांबणार आहे.ही बाब चेअरमन पाटील यांनी सातत्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे लावुन धरली होती.कल्याणशेट्टी यांनी तात्काळ संबंधित विभागाकडे विचारणा करत चपळगावकरांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले.हे दुकान सोसायटीकडे वर्ग करण्यासाठी आमदार कल्याणशेट्टी यांचे सहकार्य लाभले.आता किरकोळ डागडुजी दुरुस्ती व रंगकाम करून सर्व संचालक मिळून सोसायटीच्या माध्यमातून गावची सेवा करू,असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.