ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्य लाभार्थ्यांनी केवायसी करून घ्यावी : जमदाडे

दक्षिण सोलापूर : नागनाथ विधाते

शासन अन्न धान्य वितरण प्रणाली अंतर्गत शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांनी ई-केवायसी करणे शासनाने अनिवार्य आहे. त्यामुळे शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक सदस्य लाभार्थ्यांनी आपल्या गावातील किँवा नजीकच्या परिक्षेत्रात रास्त भाव धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई-पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सिडीग करून घ्यावयाचा आहे. अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असुन ई-केवायसी (E-KYC) पूर्ण झाल्यावरच आगामी काळात लाभार्थी सदस्याला धान्य मिळणार आहे. प्रत्येक धान्य दुकानात ई-केवायसी प्रक्रिया निःशुल्क सुरू आहे.

स्वस्त धान्य दुकानातील पॉस मशीनवर (POS Machine) अंगठ्याचा ठसा देवून शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्य लाभार्थ्यांनी केवायसी करून घ्यावी. ज्या सदस्य लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांचे धान्य बंद होणार आहे. तरी तालुक्यातील शिधापत्रिका (Ration Card) धारक कुटुंबातील प्रत्येक लाभार्थी सदस्यांनी के वायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन दक्षिण सोलापूरचे तहसिलदार किरण जमदाडे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!