अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
कम्प्युटर सायन्स हॅकेथॉन स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बॅगेहळ्ळीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्यात आठवा क्रमांक पटकावला आहे. या यशस्वी संघामध्ये कोमल मोहन शिंदे, प्राजक्ता अशोक पाटील आणि नव्या महेश किनगे यांचा समावेश होता.
या विद्यार्थ्यांना समीर कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूर, शिक्षण विभाग जि.प. सोलापूर, अमेझॉन फ्युचर इंजिनिअर, लीडरशीप फॉर इक्विटी आणि कोड टु एनहान्स लर्निंग संस्था यांच्या मार्फत आयोजित करण्यात आलेल्या हॅकेथॉन स्पर्धेत जिल्ह्यातील ४ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ३० विद्यार्थी व १० शिक्षकांची जिल्हास्तरावर या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती.
या स्पर्धेत शाळेला दोन टॅब, अलेक्सा इको, कम्प्युटर कोडींग पुस्तके, सर्टिफिकेट आणि मेडल ही बक्षिसे प्रदान करण्यात आली.शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष परमेश्वर केसुर, उपाध्यक्ष परशुराम जाधव, सरपंच रवी गायकवाड, मुख्याध्यापक नारायण इरवाडकर,संजय जाधव, राजश्री झिंगाडे, सिद्धाराम गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम आणि सृजनशीलतेच्या जोरावर मिळवलेले हे यश शाळेसाठी व गावासाठी प्रेरणादायी ठरले आहे.