---Advertisement---

आता केवळ एक मिस्ड कॉल देऊन LPG सिलेंडर बुक करा ; जाणून घ्या नवीन सुविधा

On: January 2, 2021 4:01 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना आता आणखी एक सोपा पर्याय उपलब्ध होणार आहे. इंडियन ऑईल म्हणजेच इंडेन (Indane Gas) गॅसकडून आता आपल्या LPG गॅस धारकांसाठी नवी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना केवळ एक मिस्ड कॉल देऊन LPG सिलेंडर बुक करता येईल. इंडियन ऑईलकडून नुकतीच यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यानुसार आता त्यांच्या ग्राहकांना गॅस बुक करण्यासाठी 8454955555 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

 

इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशभरात ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.  ग्राहकांना गॅस बुक करण्यासाठी 8454955555 या क्रमांकावर रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून मिस्ड कॉल द्यावा लागेल. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. सध्याच्या आईवीआरएस (इंटरॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टम) कॉल प्रणालीत कॉलसाठी सामान्य दर आकारले जातात. मात्र, आता नव्या सुविधेमुळे ज्येष्ठ व्यक्ती आणि आईवीआरएस प्रणालीचा वापर करण्यात अडचणी जाणवणाऱ्या लोकांची सोय होणार आहे.

 

अ‍ॅमेझॉनवरुनही गॅस सिलेंडर करा बुक

सिलेंडर बुक करण्यासाठी अ‍ॅमेझॉनवरील LPG कॅटेगरीवर क्लिक करावे. त्याठिकाणी तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा HP गॅसचा 17 अंकी नंबर टाकावा लागेल. यानंतर ग्राहकाच्या मोबाईलवर एक कर्न्फर्मेसन मेसेज येईल. तो कन्फर्म करताच तुमचा सिलेंडर बुक होईल. याशिवाय, अ‍ॅमेझॉन पेमेंटच्या साहाय्याने पैसे अदा केल्यास ग्राहकांना 50 रुपयांची कॅशबॅकही मिळेल.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!