ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ट्रस्टचा मोठा निर्णय : शनिदेवावर आजपासून ब्रँडेड…

अहिल्यानगर : वृत्तसंस्था

देशभरातील असंख्य भाविक शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येत असतात, आता याच भाविकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. शनिदेवावर तेलाचा अभिषेक करून पूजाअर्चा केली जाते. त्यातच मंदिर ट्रस्टने एक मोठा निर्णय घेतला आहे. शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या शिळेवर ब्रँडेड तेलाचाच अभिषेक स्वीकारला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून 1 मार्चपासून सुरू झाली आहे.

शनिदेवाच्या शिळेवर आजपासून ब्रँडेज तेलानेच अभिषेक करता येणार आहे. याविषयीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. भविष्यात शनि देवाच्या शिळेची झीज होऊ नये म्हणून शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतने हा निर्णय घेतला आहे. हा आदेश आजपासून 1 मार्चपासून लागू झाला आहे. मंदिराच्या ट्रस्टींनी याविषयीची माहिती दिली आहे. शिंगणापूर येथे शनिदेवाच्या मूर्तीवर तेल अभिषेक करण्याची परंपरा आहे. भेसळयुक्त तेलाने अभिषेक होत असल्याने शनिदेवाची स्वयंभू मूर्ती खराब होत असल्याचे ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्टचे म्हणणे आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीत अजून एक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला शनिदेवावर तेल अभिषेक करायचा असेल तर ते तेल तपासावे लागेल. जर भाविकांच्या तेलाबाबत ट्रस्टला संशय असेल तर तेलाभिषेक करता येणार नाही. अशा तेलाचा अभिषेक करता येणार नाही. असे तेल अगोदर भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे पाठवण्यात येईल. शनी शिंगणापूर देवस्थानने हा नियम 1 मार्चपासून लागू होणार आहे. या निर्णयाचे अनेक भाविकांनी स्वागत केले आहे.

संपूर्ण देशात शनिदेवाचे अनेक मंदिर आहेत. त्यात तीन सर्वात जुने पीठ असल्याचे मानण्यात येते. त्यांचे अत्यंत महत्त्व आहे. त्यात शनि शिंगणापूर, शनिश्वर मंदिर ग्वाल्हेर आणि सिद्ध शनिदेव मंदिर, काशीवन, उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. या नवीन नियमानंतर आता तेल विकत घेताना भाविकांना काळजी घ्यावी लागणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!