ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अखेर मंत्री मुंडेंनी दिला मुख्यमंत्री फडणवीसांकडे राजीनामा  !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी झालेल्या एका बैठकीत मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज धनंजय मुंडे यांनी आपल्या PA व ओएसडींच्या मार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो तत्काळ स्वीकारला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे काही फोटो सोमवारी समोर आले. यानंतर आज मनोज जरागे पाटील यांनी मस्साजोगमध्ये जात देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुख मनोज जरांगे यांच्यासमोर ढसाढासा रडले. धनंजय देशमुख म्हणाले की, माझ्या भावाला किती वेदना झाल्या असतील. मला आता वेदना सहत नाहीत, मला आई समोर बसल्याने, मुलं सोबत असल्याने मला रडताही येत नाही. मला भावाला वाचवता आले नाही, अशी खंत त्यांनी यावेळी मनोज जरांगे यांच्याकडे व्यक्त केली.

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा सूत्रधार वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांना निकटचा सहकारी आहे. या प्रकरणात त्यांचे नाव आल्यापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नाही, असे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांचा पक्ष घेईल, अशी भूमिका घेतली होती. मात्र, सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्या करतानचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर राज्यातील वातावरण संतप्त झाले आहे.

करुणा शर्मा म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी आज सांगितले दोन दिवसांनंतर आम्ही ठरवू. धनंजय मुंडे यांच्यावर पक्षातून दबाव आहे, मात्र त्यांची राजीनामा देण्याची इच्छा नाही. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये लोकांचे आणि स्वतःच्या पक्षातील आमदार, खासदारांचे किती प्रेशर येते? ही गोष्ट थांबवता येऊ शकते का? ते पाहून त्यांच्या राजीनाम्यावर निर्णय होणार आहे, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!